रायगड -नवनाथ बरकले


Raigad fort towers.jpg

रायगड (किल्ला) रायगड (किल्ला)चे ठिकाण दाखविणारा नकाशा रायगड (किल्ला)चे ठिकाण दाखविणारा नकाशारायगड (किल्ला) गुणक 18.1401°N 73.2626°E नाव रायगड (किल्ला) उंची ८२० मीटर/२७०० फूट प्रकार गिरिदुर्ग चढाईची श्रेणी सोपी ठिकाण रायगड, महाराष्ट्र जवळचे गाव रायगड डोंगररांग सह्याद्री सध्याची अवस्था व्यवस्थित स्थापना १०३० ............................... १.१ प्रस्तावना. १.२ प्रस्तुत अध्ययनाची निवड. १.३ विषयाची व्याप्ती. १.४ संशोधनाची उद्धीष्टे. १.५ संशोधनाचे महत्व. १.६ संशोधनाच्या मर्यादा. १.७ संशोधन पद्धत.

प्रस्तावना

प्रभू रामचंद्रपंताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीला यात्रेकरूंची यात्रा म्हटली जाते.कोणी नाशिकला दक्षिणेची काशी म्हणतात,तर कोणी खानदेशाचे प्रवेशद्वार ,पण तीर्थक्षेत्राशिवाय नाशिकची एक वेगळी ओळख आहे ती म्हणजे किलायांचे देश सातमाळ आणि गाळणा यांसारख्या अकराव्या भल्यामोठ्या काळ्याकभिन्न सह्याद्रीच्या पर्वतरांगा या नाशिक जिल्ह्यात पसरलेल्या आहेत आणि यावर उभे असलेले,भीम काय आणि दुर्गम असे अठ्ठावन्नकिले आहे पण प्रस्तुत अध्यानाशाठी एकाचे किल्ला निवडलेला आहे.



प्रस्तु--त अध्ययनाची निवड :-

प्रस्तुत अध्ययनातून स्थानिक इतिहास अभ्यासाला जातो.मध्ययुगीन भारताच्या इतिहासात किल्यांना फार महत्व होते.किल्यंवर सत्ता म्हणजे त्यांच्या आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता इतके किल्याचे महत्व आहे.म्हणून इतिहास अभ्यासक या नात्याने किल्याचे संशोधन करणे गरजेचे आहे.


विषयाची व्याप्ती :- नाशिक जिल्ह्यात जवळपास अठ्ठावन्न किल्ले आहेत,या किल्यांची व्याप्ती खूपच मोठी आहे.परंतु वेळेच्या,श्रमाच्या व आर्थिक स्थिती मुळे दुरवस्था होऊ शकते.प्रस्तुत अध्ययनासाठी फक्त एकाच किल्ला निवडलेला आहे.



संशोधनाची उद्धीष्टे :-

महाराष्ट्राच्या स्थापत्या वारश्याचे दोन ठळक पैलू म्हणजे लेणी आणि किल्ले पण आहेत.महाराष्ट्रामधील बरीच मोठ्या प्रमाणामध्ये गड किल्ले आहेत, याची ओळख पर्यटकांना करून देणे. महाराष्ट्रातील गड तौलनिक अभ्यासणे,महाराष्ट्रातील किल्यांचा इतिहास अभ्यासणे महाराष्ट्रातील किल्याचे वैशिष्ट्ये अभ्यासणे.

संशोधनाचे महत्व:-

प्रस्तुत अध्ययनाच्या आधारे किल्यांची रचना व त्या ठिकाणी असलेल्या इतिहासाची माहिती जमा करून इतिहासाला जिवंतपणा आणण्याचे प्रयत्न शिक्षणाच्या आधारे करण्यात आलेला आहे.तसेच पर्यटकांना महाराष्ट्रातील किल्यांची माहिती करून देणे. संशोधनाची मर्यादा :- महाराष्ट्रात साधारणतः ६०० गड किल्ले आहेत ,या सर्व किल्यांचा अभ्यास करणे वेगळ्या व आर्थिक दुरावस्था यांच्या अभावामुले शक्य नाही त्यामुळे प्रस्तुत अध्ययनासाठी किल्यांना भेट देऊन ,किल्यांच्या ठिकाणी जाऊन निरीक्षण करणे गरजेचे आहे. संशोधन पद्धत :- प्राथमिक साधने :- किल्ल्यांना भेट देऊन सर्वेक्षण व पाहणी करणे. दुय्यम साधने :- वृत्तपत्र व अमित बोरोले यांचे दुर्गभ्रमंती नाशिकची हे स्नेहल प्रकाशनाचे पुस्तक यांचा आधार घेतला. नमुना निवड पद्धत :- प्रस्तुत अध्ययनाची निवड करतांना नमुना निवड पद्धतीचा अवलंब केला नाशिक जिल्ह्यात ५८ किल्ले आहेत त्यापेकी एकाच किल्ला अध्ययनासाठी निवडलेला आहे .म्हणजेच नमुना निवड पद्धतीचा अवलंब केला आहे .


किल्यांची प्रस्थावना :-

छत्रपती शिवाजी महाराजांचे तब्बल तीनशेसाठ किल्ले आहे. असा उल्लेख बखरींमध्येतर आलेलाच आहे ,शिवाय खुद्द राजांच्या पत्रात देखील आलेले आहे ,यांतील बहुतांश किल्ले घाटावर नजर ठेवण्यासाठी बांधलेले दिसतात ,चांदवडचा घाटहा कोकण आणि खानदेश यांना जोडणारा एक महत्वाचा घाट आहे ,त्यामुळे या घाटावर किल्ले बांधले नसते तर ते मोठे नवलच होते .गडाच्या पंचक्रोषित चांदवड किल्याबाबत मोठ्या अभिमानाने बोलले जाते ,पण त्याच्या समोर अजस्र बाहू पसरून बसलेल्या रायगड किल्ल्या बाबत मात्र इतिहास उदासीन आहे.


किल्यांची रचना  :-

गुणक :- 18.14010 N 73.26260 E नाव :- रायगड(किल्ला) उंची:- ८२० मीटर / २७०० फुट प्रकार :- सिंधुदुर्ग चढाईची श्रेणी :- सोपी ठिकाण :- रायगड (महाराष्ट्र) जवळचे गाव :- रायगड डोंगररांग :- सह्याद्री सध्याची अवस्था:- व्यवस्थित स्थापना :- १०३०



भोगोलिक स्थान:- किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून ८२० मीटर उंचीवर आहे .मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे.छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्व पाहून १७ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली.शिवराज्यभिषेक याच ठिकाणी झाला .इंग्रजांनी गड काब्ज्यात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली.

इतिहास :- रायगडचे प्राचीन नाव रायरी असे होते,युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकेच रायगड अजिंक्य व दुर्गम .पाचशे वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता तेव्हा त्यास रासिवटा व तणस अशी दोन नवे होती त्याचा आकार उंची व सभोवतालचा दर्जा यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले .निजामशाहीत रायगडचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई.मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर राहिला,तर प्रतापराव मोरे विजापुरास पळला.महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजे रायगडास वेध घातला व मे महिन्यात रायरी महाराज्यांच्या ताब्यात आली.तेथे असतांना कल्यानचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापुरकडे निघाला ,बातमी महाराज्यांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला.रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेशा आहे .शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवगड ठिकाण आहे.सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे .म्हणून महाराज्यांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.


सभासद बखर म्हणते:- राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच पर्ज्यन्यकाळी कादियाव्र गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकाच आहे दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोडका दौलाताबाद्चे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले तक्तास जागा हाच गड करावा .

शिवराज्यभिषेक:- शिवराज्यभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराज्यांच्या राज्यभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे .१९ मे १६७४ रोजी राज्यभिषेकाच्या विधी पूर्वी महाराज्यांना प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घडले .तीन मन सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंतीचे छत्र देवीला अर्पण केले .गडावरील राजसभेत ६ जून १६७४ रोजी ज्येष्ठ युद्ध १३ शके १५९६ शनिवार या दिवशी शिवराज्यभिषेक साजरा केला.२४ सप्टेंबर १६७४ ललिता पंचमी आश्विन युद्ध ५ आनंद संवस्तर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राज्यांनी स्वतःला आणखी एक राज्यभिषेक करून घेतला,या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटते हा होता ,हा राज्यभिषेक निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते पार पडला .

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :-

पाचाडच्या जिजाबाईचा वाडा- उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा,वारा मानवत नसे म्हणून महाराज्यांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळ एक वाद बांधून दिला ,तोच हा मासाहेबांचा राहता वाडा.वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्था महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे ,यास ताक्याची विहीर असेही म्हणतात. खुबलढा बुरुज- गड चढू लागले म्हणजे एक बुरुजीचे ठिकाण दिसते तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरुज बुरुजाशेजारी एक दरवाजा होता त्यास चीत दरवाजा म्हणतात.पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्थ झाला आहे . नाना दरवाजा- या दरवाजास नाणे दरवाजा असेही म्हणतात ,नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा ,इ.स.१६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांच्या वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाजास दोन कमानी आहेत.दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांसाठी दोन लहान खोल्या आहेत त्यास देवडा म्हणतात.दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.

 मदार मोर्चा किंवा मशीद मोर्चा –

चित दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोथर आहे .येथे मदन शाह नावाच्या सादूचे थडगे आहे .तेथे एक प्रचंड तोफाही दिसते .येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.

महादरवाजा- महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत दरवाजावर असण्याऱ्या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत श्री आणि सरस्वती नांदत आहे,श्री आणि सरस्वती म्हणजेच विद्या आणि लक्ष्मी होय महादरवाजाला दोन भव्य बुरुज असून एक ७५ फुट तर दुसरा ६५ फुट उंच आहे .तटबंधी मध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास जंग्या म्हणतात.शत्रूवर मारा करण्यासाठी हि भोके ठेवलेली असतात .बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे .


चोरदिंडी – महादरवाजातून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते त्यावरून चालत गेल्यास जिथे हि तटबंधी संपते त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात हि चोरदिंडी बांधलेली आहे बुरुजाच्या हातून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायर्या आहेत.

गंगासागर तलाव – हत्तीतलावापासून जवळच रौगड जिल्हा परिषदेच्या धर्म शाळेच्या इमारती दिसतात.धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५०-६० पाऊले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव .

स्तंभ– गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात,त्यास स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे ,ते हेच असावेच ते पूर्वी ५ मजले होते असे म्हणतात.ते द्वादश कोणी असून बांधकामात नक्षीकाम आढळते .



रायगडावरील अश्मयुगीन गुहा -

पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बस सेवा आहे ,हि बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गी पाचाड गावातून रायगडच्या दोरवाटेच्या तळावरून पाचाड खिंडीत होते येथून पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायऱ्या काढून गेले कि रायगड माथा गाठता येतो पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे तिला म्हणतात वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा .नवे पर्यटक या गुहेला गन्स ऑफ पाचाड असे म्हणू लागले आहे .

शाळा महाविध्यालायांच्या आणि अनेक पर्यटक कंपन्यांच्या सहली रायगडावर आयोजित केल्या जातात .गडावर दोर वाटेने पाळण्यात बसून जाता येते ,तर हजारी पायऱ्या चढून रायगडावर पोचता येते.



संदर्भ सूची-

लेखक :- प्रा.आर.ए.पाटील. पुस्तकाचे नाव :– मराठ्यांचा इतिहास . प्रकाशनाचे नाव :- के.सागर पब्लिकेशन . प्रकाशन वर्ष :- १६३०-१८१८ पान.नं :- १४ ते १८