मराठी भाषा पुढे ¿¿¿ अमेरिकेतील डायनीयल एब्राम या गणिती तज्ज्ञाच्या मतानुसार जी भाषा, ती बोलणाऱ्या समाजास व्यवसाय देऊ शकत नाही ती भाषा तो समाज सोडून देण्याचा प्रयत्न करतो. एब्राम यांच्या अंदाजाप्रमाणे 21 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत संपूर्ण जगात 300 भाषा अस्तित्वात राहू शकतात. जगात आज अस्तित्वात असणाऱ्या सहा हजारांहून अधिक बोलीभाषांपैकी निम्म्या भाषा या कायमच्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. असा निष्कर्ष 2009 मध्ये नोंदविला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर जगातील भाषांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.