कवी अविनाश सुरेश नागरगोजे (15जुन1995)

कसं आहे मंडळी कवी माणसं कोणाला सोडत नसतात.आणि यातचं त्यांना आनंद वाटते. आज माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण. दोन वर्षांपूर्वी मलाही माहित नव्हतं माझाही वाढदिवस असतो. मागच्या वर्षी NIBF टीम मधील मित्रांनी कलकत्ता येथे माझा आयुष्यात पहिला वाढदिवस साजरा केला. आणि आज हा तरुणाईसोबत माझा वयाच्या 23 व्या दुसरा वाढदिवस साजरा होत आहे. आज सगळेच रेकॉर्ड मोडले रात्री दीड वाजल्या पासून शुभेच्छा येत आहेत अणखीही त्या सुरूच येत आहेत. एवढं प्रेम कुठं मिळतं. दोन तीन वर्षांपुर्वी माझ्या आयुष्यात खुप वाईट प्रसंग आले कलाकार होणं सोपं नसतं दोस्तहो भाऊसाहेब पाटणकर एके ठिकाणी म्हणतात .

आसवे नयनात दिली जर नसती कुणी तर नावही ऐकलं नसतं या शाहीराचं कुणी.

मी पूर्वी खुप सामाजिक लिहायचं आणि वाचायचंही पण त्याला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळायचा नाही योगायोगाने माझी पाटील सरांशी ओळख झाली. त्यांनी मला विनोदी लिहायला शिकवलं . आणि यातुनच पुढे मी विवेकानंदाची विश्वप्रेम ही संकल्पना समजून घेतली. हा प्रवास माझा एक वर्ष चालला पुर्वी मला खुप राग यायचा माझे कोणी जास्त मित्रही नव्हते. ते पुस्तक वाचून माझं आयुष्यच बदलून गेलं आज मला कोणी शिव्या दिल्या तरीही राग येत नाही. माझ्या मध्ये आत्मविश्वास आला चराचर विश्वात असंख्य स्त्री पुरुष आहेत जे स्वतः चं आयुष्य जगतात पण तीच माणसं सगळ्याना प्रिय असतात. जे सर्वांचा विचार करतात दुसऱ्याच्या चेहऱ्यावर ज्यांच्यामुळे आनंद निर्मान होतो. प्रेम ही एक अशी संकल्पना आहे. जिच्यापुढे कुणालाही नतमस्तक व्हावं लागतं. प्रेम दो प्रेम पावो असं आजही मला आठवतं.वेळ मिळाला तर नक्की वाचा. पुढे प्रेमावर खूप वाचणं केलं अशातच माझ्या एका मित्राने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कारण पाच वर्ष सोबत राहुन प्रियसीने दुसऱ्या सोबत लग्न केलं . त्याला त्यातून बाहेर काढण्यात माझी अर्धी शक्ती संपली. तो बाहेर निघाला अशातच एका नातेवाईकाची आत्महत्या झाली. ते एक वर्ष माझ्यासाठी खूप वाईट होतं त्याची कल्पना ही कराविशी वाटतं नाही. यातुन शिकलोही ही मी नातेसंबंधाशी जुडलो ओळखी झाल्या . आणि मला ओळख निर्माण करण्यात आनंद वाटु लागला. एकंदरीतच माझ्या बोलण्याला सुरवात झाली . सुदैवाने मला नोकरी लागली मग तर सगळं वातावरण बदललं गोष्ट माझ्या लग्नापर्यंत आली होती . बस्स माझा होकार तेवढा राहीला होता. चांगल्या काळात सगळेच जवळ येतात. शेवटी मी नकार दिला आणि पाच वर्ष कोणीही लग्नाची गोष्ट करणार नाही असं ठरलं. कलकत्ता, छत्तिसगड येथे एका बँकेत नोकरी केली . सगळं काही मजेत चाललं होतं पैसा होता मित्र होते नोकरी होती. पण मन त्यात लागतं नव्हतं सारखा माझ्यातला कवी जागा व्हायचा . कुठेतरी व्यासपीठावर मला घेऊन जायचा असंख्य श्रोत्यांसमोर मी माझी कला सादर करत आहे. सगळेच हसत आहेत टाळ्यांचा कडकडाट कसला तो आनंद ती ओळख मला बैचेन करत होतीहे चार मितींपुरत स्वातंत्र् मला आतुन पोखरुन टाकतं होतं . आणि एक दिवस मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला . 26 जुन 2017 ला लातुर मध्ये परत आलो. तितही काम करत असताना खूप मित्रपरिवार मिळवला होता. छत्तीसगड मधील NIBF च्या हिंदी व्यासपीठावर मराठी व्यासपीठ गाजविण्याचं श्रेय मला मिळालं बँकेत असताना दोन हिंदी कविता खुप लोकप्रिय ठरल्या. पुढे मी एम् ए अर्थशास्त्र ला प्रवेश घेतला महाविद्यालयात खूप कविता म्हणल्या मागच्या वर्षी यावर्षीचा सर्वोत्कृष्टकवी पुरस्कार देऊन विद्यार्थ्यांना माझ्या सन्मान केला हा आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण . बँकेतील पैशाच्या सुखापेक्षा मी माणसं कमावण्यात सुखी आहे आनंदी आहे. आणि यापुढेही राहीणं......

     भावनेच्या भरात खुप बोलतोय दोस्तहो आज बऱ्याचं दिवसंनी स्वतः बद्दल लिहिलयं. त्यामुळे कदाचित वहावत गेलो. एखाद्या कलाकाराला त्याच्या खाजगी आयुष्यातबद्दल विचारा किती दु:खमय आयुष्यातून आलेले असतात किंवा दु:खात असतात. कला समजायला आयुष्य लागतं तर कलाकार कधी कळेल मला आता आता   बा.भ.बोरकरांच्या कवितेचा थोडा थोडा अर्थ समजतोय 
       मी पण ज्यांचे पक्व  
       फळापरी गळले हो
    जीवण त्यांना कळले हो
हिरवे हिरवे गार गालिचे निसर्गाची कविता लिहीणारे बालकवी आत्महत्या  करतात. कलाकार आणि त्याचं कल्पनाविश्व वेगळं असतं. 
   असो आपल्याला काही अडचण नाही आपण विनोदी ते पण प्रेम कवी. तशी माझी लव्ह स्टोरी सांगायची राहीली की. जाऊ द्या नंतर कधीतरी असचं निवांत हे त फक्त दोन वर्षांचा सार होता पुरी फिल्म अभी बाकी है. खुप शिकायचंय अणखी. कवितासंग्रह येणार आहे. तुम्ही सोबत आहात काही अडचण नाही.
  आज तुम्ही सगळ्यांनी मला हसवलात हसलात. अभिषेक दादा , स्नेहल ताई ,प्रविण दादा, वैभव दादा, प्रणव दादा सर्व संयोजक,अम्मा बाबा, मिलिंद पहारे सर,  विशेषत: माझी टिम आर्ची परशा आणि सर्व व-हाडी मंडळी, श्वेता ,डॉ. पुजा,कांचन,मधुरा,रुपाली,निधी सारिका ताई ,शिवा, विशाल सोहम आणि सर्व प्रिय तरुणाई टिम, NIBF Team ,TCS Team , Axis मधील स्नेही मित्र. नातेवाईक , मित्र परिवार, स्नेही गुरुजण वर्ग या सर्वांचे पुन्हश: मनपुर्वक धन्यवाद, आभार व्यक्त करतो.

होतो अंधारात मी दिलास प्रकाश तु माझ्या अंधा-या जीवणात प्रकाशाची वाट तू

एक विनोदी रचना

आज तिचं लग्न म्हणून माझं

लवकरचं घरातून निघनं बस
मध्ये बसून ऐकत होतो
बाजूच्या गोष्टी कोणी म्हणत
होतं माझ्या नातीचं लग्न
कोणी म्हणतं होतं माझ्या
पोतीचं लग्न कोणी मित्राचं
तर कोणी मैत्रीणिचं लग्न
सगळ्या बसमध्ये लग्न
आणि लग्न 

मग मीही म्हटलं आज माझ्या प्रियसीचं लग्न.

धन्यवाद!

           -अविनाश नागरगोजे
            कवी - अवी