देवेंद्र भुयार (जन्म 01 फेब्रुवारी, इसवी सन 1988) गांव - गव्हाणकुंड, तालुका वरुड, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र. मूळचे गव्हाणकुंड या छोटाशा गावातील. वरुड तालुक्यातील शेतकरी संघटनेचे संघटक तथा समाजसेवक,  एक सर्वसामान्य शेतकरी- शेतमजूर कुटूंबातील.  त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा जवळून जाणनारे व लहानपनापासून समाजसेवेची ओढ व शेतकऱ्यां विषयी अपार प्रेम व आस्था असणारा युवक. सर्व सामान्यांच्या प्रश्नांकरीता आपली तहान-भुक बाजूला सारून कार्यतत्परतेने सतत रात्रंदिवस समाजाच्या सेवेकरीता संघर्ष तथा सर्व सामान्यांच्या सुख:दुखात आपले दु:ख वाटून घेणारे.  तसेच अनेक समाजसेवी संघटणांकडून त्यांच्या समाज सेवेच्या कार्याबद्दल अनेक सत्कार व पुरस्कारांनी सन्मानित. त्यांनी तालुक्यातील शेतकरी तथा युवकांच्या सहकार चळवळीद्वारे तालुक्यातील अनेक प्रश्न शासनापर्यंत पाहचविले आहेत व पोहचविण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. तसेच शेतकरी समस्या, शेतमालाला योग्य भाव मिळण्याकरीता शासन स्थरावर सतत प्रयत्नरत. त्याच बरोबर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांसाठी मदतीकरीता तसेच त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाकरीता योग्य सोय उपलब्ध करुन देण्याकरीता सतत प्रयत्नरत आहेत.  तसेच मध्यतरीच्या कालखंडात त्यांनी वेगवेगळे सामाजिक व सार्वजनीक प्रश्न व समस्या शासन दरबारी मांडण्याकरीता विविध जनआंदोलने व उपोषने केलीत व सरकारला सुद्धा त्या मान्य कराव्या लागल्या तसेच अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न थेट जिल्हा प्रशासनाकडे त्यांनी मांडले तसे त्यांना यश सुद्धा आले. तसेच याच काळात वेगवेगळया कारणांकरीता त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेले होते. त्याच बरोबर त्यांनी तालुक्यात गाव स्थरावर विविध युवकांच्या संघटना स्थापन करुन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व युवकांच्या समस्या जाणून घेण्याचा व सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

बालपण : देवेंद्र भुयार  यांचा जन्म 01 फेब्रुवारी, इसवी सन 1988 रोजी गव्हाणकुंड येथे झाला. हे गाव सद्या कपिलेश्वर देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. गव्हाणकुंड हे गांव सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी सुकी नदीच्या काठी अत्यंत निसर्गरम्य व नयनरम्य वातावरणामध्ये वसलेले आहे. येथील सातपुडाच्या पर्वतरांगांमुळे संपूर्ण वरुड तालुक्याला वेगळीच ओळख प्राप्त होते. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील हे अत्यंत सुंदर असे निसर्गांनी नटलेले छोटेचे गांव आहे. येथून वाहणारी नदी ही या गावाला एक वेगळीच ओळख प्राप्त करुन देते. याच निसर्गरम्य वातावरणामध्ये देवेंद्र यांचा जन्म झाला. त्यांचे वडील याच गावात सुरुवातीला मोल मजूरी व शेती करतात. त्यांच्या कुटूंबाची परिस्थिती सुरुवातीच्या काळात हालाकीची होती. त्यामुळे प्राथमिक शिक्षण गावामध्येच पुर्ण करुन त्यानंरचे शिक्षण त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी कसे-बसे पुर्ण केले. व शिकल्यानंतर आपल्या शिक्षणाची मदत समाजाला व्हावी या हेतूने त्यांनी समाजसेवेची कास धरली. सुरुवातीला अनेक लहान सहान सामाजिक कार्यामध्ये ते हिरीरिने भाग घेत होते. व सद्या ते शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्न व समस्या सोडवण्याकरीता कार्य करीत आहेत. त्यामुळे त्याना विद्रोही शेतकरी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते.

मो. क्रमांक - 9420077594, E_mail - devendrabhuyar@gmail.com