User:"shrutika chaudhari"/sandbox


'मांडव डहाळे’ म्हणजे काय हा कार्यक्रम कसा केला जातो ?

edit

मांडव डहाळे कार्यक्रम काही भागात लग्नाच्या एक दिवस आधी केला जातो तर काही भागात लग्नाच्या दिवशीच केला जातो. ज्यांच्या घरी लग्न असते त्यांच्या घरी मांडव टाकले जातो. घराच्या छतावर आंब्याच्या पानांच्या डहाळ्या टाकल्या जातात. त्याला ‘मांडव डहाळे’ म्हणतात. बैलगाडीतून आंब्याच्या पानांचे डहाळे आणतात. मांडवाला ढोल ताशा लावले जातो. विवाहित स्त्रिया बैलांची व बैलगाडीच्या मालकाची पूजा करतात. बैलगाडीच्या मालकाला टॉवेल टोपी देऊन औक्षण करून मान दिला जातो त्यांनतर बैलगाडीतील आंब्याच्या डहाळ्या घराच्या छतावर टाकल्या जातात. दारात गणपती चा फोटो लावला जातो व गणपती पूजन देखील केले जाते. मांडवाच्या दिवशी काही हौशी लोक जेवण देखील ठेवतात.

मांडव डहाळे व प्रत्येक पूजेला हिंदू धर्मात आंब्याची पाने महत्त्वाची का असतात? सनातन धर्म ग्रंथानुसार, आंब्याचे झाड हे मेष राशीचे प्रतीक मानले जाते. मेष राशी असल्यामुळे आंब्याचे झाड हे शुभ मानले जाते. ज्या घराजवळ आंब्याचे झाड लावले जाते त्या घरावर देवी-देवतांची कृपा असते, असं मानलं जातं. यामुळे आपण मांडव डहाळे च्या दिवशी देखील आंब्याच्या डहाळ्यांचा वापर करतो. त्याचप्रमाणे धार्मिक मान्यतेनुसार, आंबा हा हनुमान यांचे आवडते फळ आहे. त्यामुळे जिथे आंब्याची पान असतात तिथे हनुमानची कृपा असते, असेही मानले जाते. म्हणून हिंदू धर्मात प्रत्येक शुभकार्यात घराला तोरण लावताना आंब्याची पाने किंवा डहाळी लावण्याची प्रथा आहे . एवढेच नाहीतर प्रत्येक पूजेमध्ये देखील आपण आंब्याच्या पानांचा वापर करतो. मांडव झाल्यानंतर संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम पार पडले जातो.