मराठी भाषेपुढील आव्हाने

अमेरिकेतील डायनीयल एब्राम या गणिती तज्ज्ञाच्या मतानुसार जी भाषा, ती बोलणाऱ्या समाजास व्यवसाय देऊ शकत नाही ती भाषा तो समाज सोडून देण्याचा प्रयत्न करतो. एब्राम यांच्या अंदाजाप्रमाणे 21 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत संपूर्ण जगात 300 भाषा अस्तित्वात राहू शकतात. जगात आज अस्तित्वात असणाऱ्या सहा हजारांहून अधिक बोलीभाषांपैकी निम्म्या भाषा या कायमच्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. असा निष्कर्ष 2009 मध्ये नोंदविला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर जगातील भाषांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.

अमेरिकेतील डायनीयल एब्राम या गणिती तज्ज्ञाच्या मतानुसार जी भाषा, ती बोलणाऱ्या समाजास व्यवसाय देऊ शकत नाही ती भाषा तो समाज सोडून देण्याचा प्रयत्न करतो. एब्राम यांच्या अंदाजाप्रमाणे 21 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत संपूर्ण जगात 300 भाषा अस्तित्वात राहू शकतात. जगात आज अस्तित्वात असणाऱ्या सहा हजारांहून अधिक बोलीभाषांपैकी निम्म्या भाषा या कायमच्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. असा निष्कर्ष 2009 मध्ये नोंदविला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर जगातील भाषांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. मानवजातीच्या वाटचालीमधील संपन्न भाषिक वारसा नष्ट होण्यामुळे मानवी संस्कृती, बौद्धिक संपदा, कला, ज्ञान, शहाणपण वगैरेंचा ठेवा या जगाच्या पाठीवरून कायमचा नाहीसा होणार आहे.

सर जॉर्ज ग्रिअर्सनच्या लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया (1903-1923) नुसार भारतात त्या काळात 179 भाषा आणि 544 बोली अस्तित्वात होत्या. 1961 च्या जनगणनेनुसार 1652 भाषा भारतात बोलल्या जात होत्या. जी भाषा दहा हजारांपेक्षा जास्त संख्येच्या जनसमूहांमध्ये बोलली जात असेल, त्याच भाषेचा जनगणनेमध्ये मातृभाषा म्हणून समावेश करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. त्यामुळे भारतीय भाषांची नेमकी संख्या आजही उपलब्ध नाही. भाषा धोक्‍यात आलेल्या देशांमध्ये भारत प्रथम क्रमांकावर असून 198 भारतीय भाषा मृत्यूपंथावर आहेत. असा इशारा युनेस्कोने दिला आहे.

मराठी भाषा व बोली स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट केल्या गेलेल्या बावीस भाषांपैकी मराठी ही महत्त्वाची भाषा आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात मराठी बोलणाऱ्यांची संख्या दहा कोटींवर आहे. इंटरनेटवरील विकिपीडिया या ज्ञानकोशातून मिळणाऱ्या माहितीनुसार मराठी ही जगातली 19 व्या क्रमांकाची भाषा आहे. जॉर्ज ग्रिअर्सन यांच्या लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या खंड 7 व 9 मध्ये सुमारे 40 बोलीं व उपबोलींचे नमुने दिले आहेत. त्यांच्या सर्वेक्षणात तत्कालीन निजाम संस्थानचा समावेश नसल्याने मराठवाड्यातील बोलींच्या वस्तुस्थितीबद्दल आजही आपणास फारशी माहिती मिळत नाही. भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण या महाराष्ट्र खंडामध्ये (पद्‌मगंधा, 2013) मराठीच्या 60 बोलींची माहिती येते. बोलींचे प्रदेशवार, जिल्हावार भेद आढळतात. जात तत्त्वावरही बोलीतील भेद अवलंबून असल्याने एकंदर मराठी बोलींची संख्या शंभराहून अधिक असण्याची शक्‍यता आहे. वऱ्हाडी, हळवी, पोवारी, नागपुरी, अहिराणी, कोकणी, वारली, ठाकरी, डांगी, सामवेदी, कोल्हापुरी, नगरी, सोलापुरी, पुणेरी, चित्पावनी असे बोलीचे अनेक प्रकार उपप्रकार आढळतात. आदिवासींच्याही भौगोलिक, सामाजिकस्तरानुसार पोटबोली आहेत. मराठी बोलींची निश्‍चित संख्या व स्वरूप आजही अधिकृतपणे उपलब्ध नाही. शासनस्तरावरून या संदर्भात प्रयत्नही होत नाहीत.

मराठीपुढील आव्हाने आधुनिकीकरण, स्थलांतर, संपर्क व दळणवळणाची वेगवान साधने, वाढते आदानप्रदान, इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांचा प्रभाव, इंग्रजीचे वाढते महत्त्व, रोजगाराच्या संधी यांसारख्या घटकांचा परिणाम प्रादेशिक, स्थानिक बोलींच्यावर होत आहे. पारंपरिक बोलींमध्ये प्रमाण मराठी, इंग्रजी, हिंदी वगैरे भाषांचा प्रभाव वाढत आहे. ध्वनीपरिवर्तन होत आहे. पोटबोलीतील अंतर कमी होत आहे. चंद्रपूरकडील नाईकी, यवतमाळ, वर्धा, नांदेड भागातील "कोलामी'या बोली आगामी काळात नाहीशा होण्याचा संभव युनेस्कोच्या रिपोर्टमध्ये व्यक्‍त झाल