महाराष्ट्राच्या भाषिक व्यवहारांचे निरीक्षण केल्यास मराठीच्या पीछेहाटीची कारणे लक्षात येतात. जन्मल्यानंतर कौटुंबिक परिचितांशी संदेशनाची व्यवहाराची भाषा, स्थानिक बोली, त्या त्या विशिष्ट प्रदेशातील एक प्रादेशिक बोली, औपचारिक शिक्षणाचे माध्यम प्रमाणमराठी, न्यायसंस्था, आर्थिक संस्था, उद्योगधंदे वगैरे उपजीविकेशी संलग्न व्यवहाराची भाषा इंग्रजी, महाराष्ट्राच्या शासन व्यवहाराची भाषा मराठी व इंग्रजी, मोठ्या शहरातील बाजाराची, विनिमयाची भाषा हिंदी, करमणूकीच्या क्षेत्रात मुख्यत्वे हिंदी, केंद्रसरकारच्या कार्यालयांची भाषा हिंदी व इंग्रजी असा भाषिक व्यवहाराचा नकाशा दर्शवता येतो. अ