आज आदरनीय भाऊंचा वाढदिवस काय लिहावे भाऊंबद्दल सुचेना पण काही आठवणी आहेत मला आठवत मि ३ री ला नापास झालो तेव्हा भाउंनी माझी शाळा बदलली माझ्या लहानपणी मि तसा खुप त्रास दिला शाळेला दांडी मारणे अभ्यास न करणे गोट्या खेळने भाउंचा मार खाणे इतका उनाड मि असताना भाऊ मात्र माझ्या सगळ्या ईच्छा पुरयायचे मग तो सचिन चा तबल्या साठी चा हट्ट असो कि शिल्पा चा हट्ट असो भाउंनी त्याच्या त्या वेळच्या तुटपुंज्या पगारात आम्हा भावंडाना कधी कमी पडु दिले नाही अगदी मग सुरत ची नानकटाई ते मुंबई चा हलवा भाऊ खरेदी ला गेले कि आम्हा भावंडाना खाऊ मात्र यायचाच मि १० वी ला नापास झाल्या नंतर माझी शिक्षण करण्याची ईच्छा नव्हती पण त्यांनी मात्र मला १० वी पास करून माझे ऊच्च शिक्षण ही पुर्ण करून घैतले या बाबतीत माझी दोन्ही भावंडे हुशार होती म्हणून तर आज एक प्राध्यापक आणि एक पुण्याच्या नावाजलेल्या रक्तपेढी मध्ये आहेत मला आठवत मि ११ वी ला असताना सिल्क च्या कपडे आमच्या भाउंनी आमच्या साठी आणली स्वतः साठी मात्र लवकर काय कपडे घेतले आठवत नाही त्याचे दोन अपघात मला आठवतात एक अंत्यविधी उरकुन येताना झालेला व एक सुरत मध्ये झालेला त्या मुळे त्याचा गुढघा आजही दुखत असतो हे सर्व करत असताना त्यांना प्रत्येक वळणावर संकटात मोलाची साथ लाभली ती आमच्या बाईची सर्वात हळवा स्वभाव असणारे भाऊ जगदीश काकांच्या अपघाता च्या वेळेस खुप घाबरले होते अशा या भाऊन बद्दल काय लिहावे हे कळत नाही आणि सुरूवात केली तर आठवणी संपणार नाही अशा या आमच्या भाऊंना त्याच्या वाढदिवसाचा दिवशी सर्व बाहेती परीवार तर्फे खुप खुप शुभेच्छा आपणास निरोगी व दिर्घायुच्छ लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना