अपघात ग्रस्तांचा मदतगार. 'हैल्लो शाम भाऊ बोलता का? बेम्बला जवळ अपघात झालाय...जरा येता का? पलीकडून बोलणारा शाम नावाचा तरुण अधीर होऊंन पत्ता विचारतो आणि लगेच मदतीसाठी घटना स्थळी पोहचतो.असा कॉल त्याला कधीही येतो,पहाटेच्या ५ वाजता,रात्रीच्या १२ वाजता,किंवा दुपारच्या ३ वाजता, परतु तो कंटाला करीत नाही,मदतीसाठी धाउन जातो, श्याम रामदास सवाई. वय ३8 वर्ष,कारंजा लाड जिल्हा - वाशिम येथील नूतन कालोनी मधे रहनारा हा तरुण.विद्यार्थी दशेत असतांना वयाच्या १७ व्या वर्षीच मानवतेच्या विचारांनी प्रेरित होउन सर्वधर्म आपातकालीन पथक (सास) ची स्थापना केलि,या पथकाला २० वर्षे झाली आहेत,हे पथक वाशिम जिल्ह्यतच नव्हे तर पच्छिम विदर्भात मदत कार्यासाठी अग्रेसर ठरले आहे .सदर उपक्रमा मुले रोड अपघात ग्रास्ताना मदत होत आहे.