• “मुलांवर योग्य संस्कार कसे कराल .....”*

1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावा. 2. घरात मुलांसमोर आदळ-आपट, भांडणे करू नका. 3. रोज एक चांगले काम करण्याची सवय लावा त्याबद्दल दररोज घरात मुलांसमक्ष चर्चा करा. 4. मुलांना अपमानास्पद बोलू नका, मूल तुम्हाला टाळणे चालू करेल. 5. मुलाने चूक केल्यास त्याला चांगल्या पद्धतीने समजाऊन सांगा व माफ करा, त्याने चांगले काम केले असेल तर त्याचे तोंड भरून कौतुक करा. 6.मुलांसाठी आई-बाबांकडे वेळ असावा. 7. आई साठी व आजी-आजोबांसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या-छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे.

8. मूले ही आपल्या भविष्याची सोय नाहीत, म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका.

9. मुलांदेखत कुठलंहि व्यसन करू नका. 10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या, मूल कितीही लहान असेल तरी ! 11. आपण मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा. 12. आपल्या मुलांच्या गरजा समजून घ्या. 13. मुलांच्या प्रश्नांना समर्पक व वैज्ञानिक दृष्टीने उत्तरे द्या. त्यांची प्रश्ने टाळू नका. 14. श्रध्दा व अंध-श्रध्दा यांतील फरक मुलांना समजावून सांगा. 15. मुलांना लहानपणीच मोबाईल खेळणे म्हणून देऊ नये. टी व्ही, लॅपटाॅप ई. ची सवय लावू नये. 16. मुलांना घराबाहेर मैदानी खेळ खेळण्याची सवय लावावी. पराभव सहन करता आला पाहीजे ! 17. मुलांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण करावी. 18. मुलाची प्रत्येक मागणी सर्रासपणे पूर्ण करू नये. त्यांना नकाराची सवय लावावी. 19. ईतरांचा मान-सन्मान करणे, अदबीने बोलणे शिकवावे, भाषा चांगली असावी ! 20. ऑफिस मध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना पालक म्हणून घरी या.

21. मुलांशी कधीही नाकारात्मक-दृष्ट्या बोलू नये.

22. मुलास नालायक, गाढव, मूर्ख ई. अपमानकारक शब्द वापरू नये. 23. मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो (विशेषत: आई), परंतु मुलांना काही प्रमाणात रिस्क घेऊ द्यावी. 24. मुलांना मारणे अत्यंत चुकीचे आहे, त्यामुळे मूले खोटे बोलायला लागतात....... प्रेमापोटी देखील मारू नये. 25. तू जर हे केलस तर मी सोडून जाईन, तुला एकटे सोडून देईल असे मुलांशी कधीही बोलू नये. 26. मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या वर्तनाचे कौतुक करावे. 27. यशस्वी लोकांबाबत घरात नेहमी चर्चा करावी. 28. मुलांच्या प्रगती-पुस्तकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा. 29. समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांबाबत मुलांशी चर्चा करा, हत्या, आत्महत्या, हिंसा, ई. कशा वाईट आहेत हे समजावून सांगा. 30. मुलांचे मित्र, मैत्रीणी कोण आहेत, त्यांचेशी पण संवाद असू द्या. 31. मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष पूरवा, आवश्यकते नुसार तज्ञांचा सल्ला घ्या. 32. आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरू व्हा !