कौठडी तालुका,दौंड जिल्हा पुणे भिमा नदी खोऱ्यात वसलेले एक लहान व सुदर असे गाव आहे गावाच्या उत्तरेला व पश्चिमेकडे जिरेगाव दक्षिणीकडे शिरसुफळ तर पूर्वेकडे मळद ही गावे आहेत लोकसंख्या साधारणपणे 1200 च्या आसपास आहे गावामध्ये हिंदू, मुस्लिम व बौद्ध धर्माचे लोक राहतात मुख्य व्यवसाय हा शेती असून त्या मध्ये बाजरी,गहू,ज्वारी व मका हे धान्य तर नगदी पिकामध्ये डाळिंब,ऊस,कांदा हे पिके घेतली जातात शेती बरोबरच जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, कुकुट पालन केले जाते गावाच्या उत्तरे कडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व त्याच बरोबर गावचे ग्राम दैवत श्री कालभैरवनाथ जोगेश्वरी चे मंदिर आहे या मंदिराच्या परिसरात पडावं कालीन शिळा आहे मंदिराच्या समोरच मारूती मंदिर,विट्ठल रुक्मिणी मंदिर व महादेवाचे मंदिर आहे गावामध्ये शिक्षण समिती, तंटामुक्त गाव समिती व गावाच्या विकास कार्यासाठी वि,का,सह, सोसायटी आहे