सातभाई हे पक्षी थव्याने राहणारे आहेत - एका सांगोला सारख्या दुष्काळी भागात हे पक्षी वावरताना आढळून येतात- पिवळ्या डोळ्याचे सातभाई मानवी वस्तीजवळ रेंगाळत असतात- दुपारच्या वेळी हे पक्षी आंब्यासारख्या झाडावर बसून जोर&जोराने ओरडत असतात- विशेष म्हणजे सातभाई हे पक्षी खूप एकोप्याने राहातात- पिलांची काळजी कुटुंबातील सर्वच सदस्य घेत असताना मी पहिले आहे- सातभाई चे पिलू चारा खाण्याच्या ठिकाणी सतत तोंड उघडून कर्कश आवाजात ओरडत असते- त्याचे सर्वच पालक सातभाई एक&एक करून पिलाला भरवत असतात- पिल्लू हे खूप खादाड असते- मी असेही पहिले आहे की सातभाईच्या घरट्यात पावश्या नावाचा पक्षी अंडी घालतो- व अंडी उबवण्याची जबाबदारी सातभाईवर सोडून मोकळा होतो- सातभाई हा पक्षी खरोखरच आपल्या परिवारमध्ये भाईचार्याने राहणारा पक्षी आहे- त्याचबरोबर पावश्यासारख्या ऐदी पक्षाची अंडी सुद्धा बिनबोभाट उबवत असतो- घराच्या आसपास वावरणारा सातभाई उन्हाळ्यात गर्द झाडीत थव्याने बसून एकसुरात गलका करीत असतात- घरासमोर पक्ष्यांसाठी ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात अथवा झाडांच्या आळ्यामध्ये साठलेल्या पाण्यात डुंबण्याचा आस्वाद घेत असतात-