मि भुषण श्रीराम भावसार माझा जन्म 19 जुलै 1990 रोजी येवला या गावात झाला. .त्या नंतर काही वर्षाने आम्ही म्हणजे आई वडिल 2 भाऊ एक लहान आणि एक मोठा आणि मि मधला असे आम्ही 3 भावंड नाशिक मध्ये स्थाईक झालो.. दिवस खुप हालाकीचे असल्यामुळे लहानपणा पासुनच कामाची सवय लागली. काम करून शाऴा केली मग कॉलेज केलं.मी लहानपणा पासुनच गायन स्पर्धा, डान्स, लेझीम असे खुप प्रकारच्या कार्यक्रमात भाग घ्यायचो त्यामुळे अभ्यासात तितकं काही मन लागत नसे. नंतर कॉलेजला असतांनी मला नाटक करण्याची संधी मिळाली. माझ 2012 मध्ये सर्वात पहील नाटक होत साईचरित्र एक महानाट्य त्या नंतर अभिनय शिबीर केलेत मग एकांकीका स्पर्धा खेलु लागलो,प्रायोगीक रंगभुमीला जोडलो गेलो.या सगळ्या माझ्या घरच्यानी खुप मला साथ दिली. काही प्रसंग खुप वाईटही आले..पण त्यातुन खुप चांगले अनुभव भेटले. .प्रायोगिक करता- करता मग मी दिग्दर्शना कडे वळालो. मग एकांकीका दिग्दर्शीत करू लागलो. नंतर मग कॅमेरा कडे आलो काळाची गरज असल्या मुळे कॅमेरामध्ये अभिनय कसा कराचा ते शिकायला सुरुवात केली