आता उठवु सारे रान आता पेटवु सारे रान,शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण म्हणत महाराष्ट्राची रणरागिनी , महाराष्ट्र राज्याच्या माजी महसुल मंत्री मा.आ.डाॅ शालिनीताई पाटील यांनी २ डिसेंबर २००८ रोजी औरंगाबाद येथे क्रांतीसेना नामक पक्षाची स्थापना केली.

  जाती पातीला नाही थारा आर्थिक निकष हाच नारा असा नारा देत शालिनीताईनी क्रांतीसेनेचे महाराष्ट्रभर जाळ निर्माण केले. सर्व जाती धर्मातील गरिबांना आर्थिक निकषावर आरक्षण जाहीर करण्यात यावे, दलित-सवर्णामध्ये दरी निर्माण करणारा अॅट्राॅसिटी कायदा रद्द करावा, कर्नाटक सिमा प्रश्न सोडवुन तेथील मराठ्यांना न्याय मिळवून द्यावा, खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल विकास महामंडळास ५००० कोटी निधी उपलब्ध करुन द्यावा, शेतकऱ्यांना संपुर्ण वीज बिल व कर्जमाफी करुन वीज मोफत द्यावी,शेतकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी राज्य विमा महामंडळाची स्थापना करण्यात यावी,अशा प्रमुख मागण्या करून क्रांतीसेना महाराष्ट्रातील लोकांच्या मनात घर करु लागली.

  शालिनीताईनी लावलेले रोपटे पाहता पाहता वटवृक्ष बनत चालले. महाराष्ट्रात क्रांतीसेनेच्या शेतकरी आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी,युवती आघाडी,विद्यार्थी आघाडी व अल्पसंख्यांक आघाडीच्या कार्यकर्त्यांचे जाळे बनत चालले.ज्या प्रमाणे मुठभर मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजीराजे यांनी स्वराज्य उभारले त्याच प्रमाणे क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष तांबे यांच्या नेतृत्वाखाली नितीन भैय्या देशमुख, मधुकर म्हसे पाटील , प्रतापसिंह पाटील, सुभाष चाटे,शहाजीराजे कोळपे,महेश शिंदे,रघुनाथ भोसले,दिपक पाटील अशा अनेक मावळ्यांच्या साथीने शिवरायांचे स्वराज्य स्थापन करत आहे.